काटय़ावर काटा

काटय़ावर काटा

  • जेवणं, झोपणं, सकाळी लवकर उठणं,
    फिरणं यांना योग्य शिस्त लावली नाही
    तर शरीर कुरकुरणारच!
    आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपण सदैव ताजं-तवानं असावं, छान दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी काय करावं हे मात्र कळत नाही. खरंतर आपल्या सवयी आणि आपली दिनचर्या हेच आपलं असणं आणि दिसणं ठरवते. ती सुधारली की आपल्याला जे हवं ते सहज मिळतं.
    1 पोटाला घडय़ाळाच्या काटय़ात न अडकवता ख:याखु:या भुकेशी जोडावं.  खरीखरी भूक लागल्यानंतर जेवायची काही औरच मजा असते.
    2 वडापाव, चहा, कॉफी यासारखा अयोग्य आहार घेऊन भूक मारणं म्हणजे न संपणा:या आजारांना स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं असतं. तेव्हा हे टाळायला हवं.
    3 वेळेवर झोपणं ही गोष्ट वाटते साधी पण खूप महत्त्वाची! वेळेवर झोपलं तर सर्व दैनंदिन विधी वेळेवर पार पडतात. आयुव्रेदात प्रात:काळी मलविसजर्न होण्याला फार महत्त्व आहे. अन्यथा पोटात मल तसाच राहिला तर त्याचेच पुढे विषारी घटकांत रूपांतर होतं. हेच विषारी घटक पुढे जाऊन शरीरात अनेकविध व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत होतात.
    4 वरील तिन्ही गोष्टी पाळल्या तरी काय खावं हा प्रश्न उरतोच. जेवताना भाजीला पोळी न लावता, पोळीला भाजी लावावी अर्थात भाज्या जास्त खाव्यात. जेवणाची सुरुवात वरण-भातापासून करावी. नंतर सलाड घ्यावं म्हणजे पुढचा आहार आपोआप कमी होतो. जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास बारीक चावून खावा. साधारण वीस मिनिटांनंतर मेंदूलाही संवेदना होते की पोट भरलं आहे. म्हणून शांतपणो प्रसन्न चित्तानं मन स्थिर ठेवून जेवावं.  नाहीतर पोट पोट न राहता धान्य भरण्याचं पोतं होऊन जातं.
    5 आहाराबरोबर  शरीरासाठी महत्त्वाचा असतो तो व्यायाम. व्यायाम प्रकार कुठलाही निवडावा पण 5क् ते 6क् मिनिटं व्यायाम हवाच. चालावं, धावावं,  सायकल चालवावी, दोरीच्या उडय़ा माराव्या यातलं काहीही करावं पण व्यायाम न चुकता करावा. एक म्हण आहे- घोडा का अडतो, भाकरी का करपते तर न फिरल्यामुळे. त्याच न्यायानं सांधे का दुखतात, साखर का वाढते, वजन का वाढतं, बीपी का वाढतो तर उत्तर तेच आहे- न फिरल्यामुळे! तर चालण्या-फिरण्यामुळे आपण आजारांपासून दूर राहू शकतो.
    6 मोबाइलचा वापर कमी कराव किंवा अभिषेक बच्चन म्हणतो तसे
    ‘वॉक व्हेन यू टॉक’ हा नियम पाळावा. म्हणजे कमीत कमी थोडा व्यायाम तरी होईल.
    7 सतत आनंदी राहावं. लहानसहान गोष्टीत सुख शोधावं, गोड बोलावं, मेंदूच्या शेतात चांगल्या विचारांची पेरणी करावी, चांगल्या गोष्टीत आपला फावला वेळ व्यतित करावा, चांगलं दज्रेदार साहित्य वाचावं, आपले छोटे-मोठे छंद आवजरून जपावेत. या सर्वात आपल्याला सुदृढ आणि आनंदी ठेवण्याची  खूप ताकद असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *