शाहीन होती सलमान खानचे पहिले प्रेम!

शाहीन होती सलमान खानचे पहिले प्रेम!

बॉलीवूडचा दबंग खान सलमान याच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेविषयी काही वेगळे सांगायला नको. त्याच्या प्रेयसींची एक मोठी लिस्ट आहे. पण सलमानची पहिली प्रेयसी कोण होती हा त्याच्या बहुतेक चाहत्यांना पडलेला प्रश्न आता सुटला आहे. स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाने याचा खुलासा केला आहे. शाहीन ही सलमानचे पहिले प्रेम होती असे तिच्या आईने स्पॉटबॉयशी बोलताना सांगितले.
शाहीनची आई भारती जाफ्री यांनी याबाबतचा खुलासा केला. सलमान आणि शाहीन हे बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. आम्ही त्यावेळी शेजारी होतो. सलमानला मैने प्यार किया या चित्रपटाने स्टारडम मिळण्यापूर्वीच या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि ते लग्नदेखील करणार होते. पुढे भारती म्हणाल्या की, सलमानला आम्ही आमच्या घरच्या व्यक्तीसारखेच समजायचो आणि त्याचे कुटुंबही शाहीनला आपल्यातीलच एक समजायचे. त्यामुळे हे दोघे नक्कीच लग्न करणार असा आमचा सर्वांचाच समज झाला होता. पण, नंतर सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आम्ही कधीच सलमानचे नाव तिच्यासमोर काढले नाही.
सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर शाहीनने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ती एअरलाइन कंपनीमध्ये कामाला लागली. तिथे तिची ओळख विक्रम अग्रवाल याच्याशी झाली. शाहीनने विक्रमशी लग्न केले असून तिला दोन मुले आहेत, असे भारती यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *