महाराष्ट्रातून दररोज ४०० ट्रक कापूस गुजरातकडे!

गुजरातमध्ये कापसाला बोनस जाहीर झाला असून, दरही बऱ्यापैकी असल्याने महाराष्ट्रातून दररोज ४०० पेक्षा जास्त ट्रक कापूस गुजरातला जात आहे. महाराष्ट्राच्या बाजारपेठेत कापसाचे दर ४,६०० ते ४,७०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत; परंतु गुजरातमधील व्यापारी यापेक्षा जास्त दर देऊन कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे येथील कापूस व्यापाऱ्यांचा ओढा गुजरातकडे आहे.

यावर्षी कापूस उत्पादक देशात कापसाचे उत्पादन घटले असून, कापसाची मागणी वाढली आहे. आजमितीस कापसाच्या २८ लाख गाठी निर्यात झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाचे दर ४ हजार ६०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. कमी पावसामुळे गुजरातमध्ये यावर्षी जवळपास ३० लाख क्ंिवटलने कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे गुजरातमधील कापसावर आधारित उद्योग, कारखान्यांना कापूस कमी पडणार आहे.

या पृष्ठभूमीवर गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कापसाचे प्रतिक्ंिवटल दर वाढवल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता गुजरातमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस विकण्याचा सपाटा लावला आहे. यावर्षी भारतात कापसाचे उत्पादन घटले, तसेच ते पाकिस्तान, अमेरिका आणि चीनमध्येही घटले आहे. त्यामुळे यावर्षी निर्यातीला चांगली संधी चालून आली आहे. मागील वर्षभरात भारताने केवळ ४० लाख गाठींची निर्यात केली होती. यावर्षी आतापर्यंत २८ लाख गाठींच्या वर कापसाची निर्यात झाली आहे. विदेशात कापसाची मागणी वाढली आहे, तसेच सरकीचे दरही वाढले आहेत. या अनुकूल परिस्थितीचा लाभ यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाची आवक वाढली असून, आजमितीस शेतकऱ्यांनी ९० लाख क्ंिवटलच्या वर कापूस विकला आहे. दररोज ४०० ट्रकच्या वर कापूस गुजरातला चालला असून, एका ट्रकमध्ये जवळपास ९० ते १०० क्ंिवटल कापूस असतो.

गतवर्षी दररोज १२०० ट्रक कापूस गुजरातला जात होता, तो यावर्षी ४०० ट्रकच्या जवळपास आहे. यावर्षी हे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातही कापसाचे खासगी बाजारातील दर ४,७०० प्रतिक्ंिवटलपर्यंत आहेत. हमी दरापेक्षा हे दर ५०० ते ६०० रुपये अधिक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *