चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कांदा निर्यातीत १८ टक्क्यांची घट झाली. या कालावधीत ४.८६ लाख टन काद्यांची निर्यात करण्यात आली.
भाववाढ रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे या निर्यातीला मोठा फटका बसला. गेल्या वर्षी ५,८९,९००.८९ टन कांद्याची निर्यात झाली होती. राष्ट्रीय हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ)ने ही आकडेवारी सादर केली आहे.
या कालावधीत निर्यातीचे किमान मूल्य ७०० डॉलर प्रतिटनांपर्यंत वाढवण्यात आले होते. दरम्यान, कांदा निर्यातीचे किमान मूल्य रद्द करताना सरकारने या निर्यातीला प्रोत्साहनाची भूमिका घेतली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाही सरकारने निर्यात मूल्य ४०० डॉलपर्यंत कमी केले होते. २०१४-१५ या पीकवर्षामध्ये कांदा उत्पादन १८९ लाख टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.