उत्तर अफगाणिस्तानला शुक्रवारी रात्री जोरदार भूकंपाचा धक्का बसला. अफगाणिस्तान जवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा धक्का पाकिस्तानसह उत्तर भारतालाही जाणवला.
शुक्रवारी रात्री १२.३०च्या सुमारास उत्तर अफिगाणिस्तानला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. अफगाणिस्तान आणि तजाकिस्तान सीमेजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, पाकिस्तानसह उत्तर भारतालाही या भूकंपाचे धक्के जाणवले.
पाकिस्तानसह इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, फैसलाबाद, सारगोधा, शैखुपुरा, मुलतान, सैलकोट गुजरात शहरांना भूकंपाचा धक्का जाणवला. तसेच पंजाब, खैबर-पखतुन्ख्वा प्रांतालाही भूकंपाचा धक्का जाणवला.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नागरिक झोपलेले असतांना अचनाक भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक घरातून बाहेर पडले.
या भूकंपामुळे पेशावरमधील ५९ नागरिक तर खैबर-पखतुन्ख्वा प्रांतातील १७ नागरिक आणि लाहोर येथील १२ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.