उत्तर प्रदेशात पाच दलित महिलांची नग्न धिंड

लखनौ- उत्तर प्रदेशातील हरेवा गावामध्ये पाच दलित महिलांना नग्न करून गावातून धिंड काढल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गावातील मुलगी दलित मुलासोबत पळून गेल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. गावातील पंधरा नागरिकांनी पाच दलित महिलांना मारहाण करून नग्न केले होते. गावातून धिंड काढल्यानंतर त्यांना महामार्गावर उभे करण्यात आले होते. पंधरापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुलीच्या आईने सांगितले की, ‘आम्हाला घरामधून बाहेर ओढून गावामध्ये नेण्यात आले. गावात कपडे काढून बेदम मारहाण करण्यात आली. शिवाय, गावातून धिंड काढल्यानंतर महामार्गावरील एका चहाच्या टपरीजवळ चार तास उभे करण्यात आले. गावातील इतर नागरिक आल्यानंतर आमची सुटका झाली.‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *