रांची – झारखंडच्या नवनिर्वाचित राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राज्यपालपदाची शपथ घेतली. झारखंडच्या राज्यपालपदी विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला आहेत.
झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विरेंद्र सिंग यांनी मुर्मू यांना राज्यपालपदाची शपथ दिली. यावेळी या शपथविधीसोहळ्यास झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, कॅबिनेटमधील मंत्री, माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि अर्जुन मुंडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सय्यद अहमद यांच्याकडे मणिपूर राज्याच्या राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याने झारखंडच्या राज्यपालपदी द्रौपदी यांची नियुक्ती करण्यात आली.