अंधेरीतल्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केली आहे. महागडे कपडे खरेदी केल्यानं घरच्यांनी तिला ओरडल्यावर तिचं घरात जोरदार भांडण झालं.
पीडित मुलगी भांडणाच्या रागातून घराबाहेर पडली. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी मुलीने कुर्ला स्थानक गाठलं. यावेळी उमेश कवाडे आणि दिनेश यादव या दोन आरोपींनी मुलीला मदत करण्याची तयारी दर्शवली. यानंतर तिघेही सीएसटी स्थानकात पोहचले. पण तिकीट उपलब्ध नसल्यामुळे आरोपींनी पीडित मुलीला आपल्यासोबत राहण्याची विनंती केली आणि याच वेळी रात्री 8.30 वाजल्याच्या दरम्यान धारावी परिसरात पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केला.
एका सामाजिक कार्य़कर्त्याला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे.