आगळा वेगळा विवाह सोहळा

आगळा वेगळा विवाह सोहळा

आजवर आपण अनेक विवाह समारंभ पाहिले असला. आतापर्यंत अनेक विवाह समारंभांना उपस्थित देखील राहिला असाल. मात्र आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाला उपस्थित राहण्याचा योग क्वचित येतो. विवाहाच्या रेशीम गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, असे म्हणतात. या म्हणीचा प्रत्यय नुकताच धुळे जिल्ह्यातील बळसाणे येथे अवघ्या साडेतीन फुटाच्या जोडप्याच्या लग्न समारंभात उपस्थितांना अनुभवायला मिळाला.

विशेष म्हणजे लग्न लावणाऱ्या भटजींनी मंगलाष्टक म्हणत असताना  मधून-मधून शेरोशायरी केल्याने या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचा आनंद आणखी द्विगुणीत झाला.

३.८ फुट उंचीचा नवरदेव धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रहिवाशी. मध्य प्रदेश राज्यातील झाबूआ जिल्ह्यातील कल्याणपुरा येथील रहिवाशी असलेल्या वधूची उंची ३ फुट. दोघांचीही उंची  कमी. सामान्यांपेक्षा कमी उंची असल्यानं लग्न कसं जमणार हा प्रश्न दोन्हीकडच्या कुटुंबियांना सतावत होता. मात्र योग जुळून आले  लेट पण थेट असं म्हणत धीरज-पूजा लग्नाच्या रेशीम गाठीत बांधले गेले.

धीरज शेअर मार्केट व्यावसायिक आहे. तर पूजा वाणिज्य शाखेचं शिक्षण घेऊन शहरात मॉल चालवते. एकमेकांची साथ लाभल्यामुळे धीरज आणि पूजा खूपच खूष आहेत. विशेष म्हणजे कुठलाही पूर्व संबध नसतांना ते अनोख्या पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *