मॅगी’ची जाहिरातीमुळे माधुरी अडचणीत, अन्न-औषध प्रशासनाकडून नोटीस

मॅगी’ची जाहिरातीमुळे माधुरी अडचणीत, अन्न-औषध प्रशासनाकडून नोटीस

मॅगीची जाहिरात केल्यानं अभिनेत्री माधुरी दीक्षित अडचणीत सापडली आहे. जनतेची दिशाभूल केल्याच्या आरोपावरुन हरिद्वारच्या अन्न-औषध प्रशासनानं माधुरी दीक्षितला नोटीस धाडली आहे.

माधुरीला 15 दिवसात नोटीशीला उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र जर उत्तर दिलं गेलं नाही तर माधुरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मॅगीमध्ये शरीरासाठी घातक असणारे विशिष्ट घटक असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं देशभरात मॅगीवर बंदी घालण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *