पुण्यात तलावामध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

पुण्यात तलावामध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

लग्नाची पार्टी करण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. अतिमद्यप्राशन केल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शनिवारच्या रात्री पाच तरुण लग्नाची पार्टी करण्यासाठी भेटले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हे पाचजण पोहण्यासाठी मस्तानी तलावामध्ये उतरले. त्यापैंकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

मृतांपैकी एका तरुणाचे नाव सुनील गायकवाड असल्याचे समजते. अद्याप दुस-या तरुणाचे नाव समजलेले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाकडून या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *