शीना बोरा हत्येप्रकरणी काल सीबीआयने पीटर मुखर्जीला अटक केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. तसेच सीबीआय या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे करु शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचेही नाव चार्जशीटमध्ये दाखल करु शकते.
काल अटक करण्यात आलेला इंद्राणीचा पती पीटर मुखर्जींची सध्या कसून चौकशी सुरु आहे. सीबीआयच्या टीमला असे आढळून आले आहे की, एक खास पोलीस अधिकारी याप्रकरणाच्या चौकशीसाठी जाणूनबुजून उशीर करीत होता. त्यामुळेच या अधिकाऱ्याचे नावही चार्जशीटमध्ये दाखल केलं जाऊ शकतं.
दरम्यान, पीटर मुखर्जीच्या अटकेनंतर त्याचा मुलगा राहुल याची देखील 12 तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात अनेक हाय प्रोफाइल लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.