राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रीधर तावडे यांच्या पश्चात पत्नी विजया, विनोद व विलास ही दोन मुले, मुलगी जया कदम, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्याआधी विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील मातोश्री या निवासस्थानी श्रीधर तावडे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येणार आहे.
श्रीधर तावडे यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे लालबाग येथील तेजुकाया मॅन्शनच्या छोट्या खोलीत गेले. वडीलांच्या प्रेरणेतूनच विनोद तावडे यांनी राजकारणात प्रवेश केला.