हिंदू असल्याने तरुणीला नोकरी नाकारली

हिंदू असल्याने तरुणीला नोकरी नाकारली

मुंबईत मुस्लिम असल्याने नोकरी आणि घर नाकारल्याचं उदाहरण ताजं असतानाचं पाकिस्तानमध्येही अशाच धार्मिक भेदभावाची पुनरावृत्ती झाली आहे. परंतु यावेळी हिंदू असल्याने एका उच्चशिक्षीत तरुणीला नोकरी नाकारण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहणारी संध्या दास उच्चशिक्षीत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने एमएससीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेली आहे. परंतु केवळ हिंदू असल्याने ती अजूनही नोकरीपासून वंचित आहे.

पाकिस्तानात हिंदू तरुणांना नोकरी मिळण्यात अनेक अडचणी येतात. शिवाय त्यांच्यासोबत दरदिवशी हिंसा, भेदभाव केला जातो. मात्र गृहमंत्रालयाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप संध्याचे वडील बिशन दास यांनी  केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *