पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरेंना दोन महिन्यांची कैद

पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरेंना दोन महिन्यांची कैद

पैठणचे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांना कामगार न्यायालयाने दोन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. संत एकनाथ साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतरच्या लाभापासून वंचित ठेवल्याने त्यांना शिक्षा ठोठावली आहे.

आमदार संदीपान भुमरे हे संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक आहेत.

निवृत्तीनंतरचा आर्थिक लाभ मिळावा यासाठी कारखान्याचे कर्मचारी असलेल्या शेख गफूर शेख हुसेन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानुसार 2009 साली तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने कारखान्याच्या व्यवस्थापनाला 2 लाख 66 हजारांची रक्कम 8 टक्के व्याजासह आणि खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.

मात्र कारखान्याचे चेरमन असलेल्या आमदार भुमरे आणि व्यवस्थापकीय संचालकांनी याची दाखल न घेतल्याने अखेर न्यायालायाने या प्रकरणी त्यांना ही दोन महिन्यांची शिक्षा सुनावाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *