महाराष्ट्रात 11 विधान परिषदेच्या निकालाकडे राजकीय पक्षांसोबत राज्याचे लक्ष लागलं असताना नाशिकचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजप बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गिते यांनी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आघार घेतली अशी चर्चा असताना आज निकालाच्या दिवशी त्यांनी एकनाश शिंदे यांना धक्का दिला आहे. महायुतीचे उमदेवार नरेंद्र दराडे यांचा दारूण पराभव केला आहे.
पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला मतं त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. हा नाशिकमधील ऐतिहासिक विजय मानला जातोय. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच गोकुळ गीतेंनी मोठी आघाडी घेतली होती. गोकुळ गीते यांना 357 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. तर नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली तर 13 मतं ही अवैध ठरली आहे.
