त्र्यंबक मंदिरातील लाडू प्रसाद गायब, मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून वितरण बंद

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे दिला जाणारा बुंदीच्या लाडूचा प्रसाद गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. मंदिर ट्रस्टने अचानक त्याचे वितरण बंद केले आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने कुठलेही कारण दिलेले नाही. याबाबत स्पष्टपणे कोणीही बोलत नसले, तरी यामागे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईच्या धाकाने हा लाडू प्रसाद बंद झाल्याचे खासगीत बोलले जात आहे.

दिवसाकाठी साधारण पाच हजार लाडू पॅकेट्‌सची विक्री केली जात आहे. मात्र, मागच्या पंधरा दिवसांत ट्रस्टतर्फे अचानक लाडू विक्री बंद करण्यात आली आहे. याबाबत स्पष्टपणे कोणीही बोलत नसले, तरी यामागे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धाकाने हा लाडूप्रसाद बंद झाल्याचे खासगीत सांगितले जात आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मुटकुळ्याचे लाडू प्रसाद म्हणून देण्यासाठी निविदा सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. तथापि चेअरमन म्हणून सहधर्मदाय आयुक्त यांनी कारभार हाती घेण्यापूर्वी देवस्थान ट्रस्टने सध्या बुंदीच्या लाडूचा प्रसाद पुरवठा करणाऱ्या मक्तेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली होती. तथापि राज्यात तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर अचानकपणे त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणारा लाडूचा प्रसाद बंद झाला आहे. त्यासाठी मंदिर प्रांगाणात ठेवण्यात आलेली टपरी बंद अवस्थेत आहे.

३० मार्च २०२५ पासून ट्रस्टतर्फे लाडूचा प्रसाद देण्यात येतो. त्यासाठी निविदा काढून पुरवठादार नेमण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टला दोन बुंदीच्या लाडुूचा बॉक्स १६ रुपयांना मिळत होता आणि देवस्थान ट्रस्ट २० रुपयांना त्याची विक्री करीत असे. दररोज पाच हजार पॅकेट विक्रीतून देवस्थान ट्रस्टला २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. महिन्याकाठी सहा लाख रुपये उत्पन्न देणारा हा प्रसाद अचानक का बंद करण्यात आला याचे कुतूहल मंदिर परिसरात निर्माण झाले आहे. आतापर्यंत किमान एक कोटी रुपये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला या लाडू विक्रीच्या माध्यमातून मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *