गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पॅरिस पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजांनी हादरले आहे. उत्तर पॅरिसमध्ये पोलिसांच्या शोधमोहीमेदरम्यान गोळीबार झाला असून यात एक पोलिस किरकोळ जखमी झाला आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून उत्तर पॅरिसमधील सेंड डेनिस येथे पोलिसांची शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान एका इमारतीमध्ये लपलेल्या संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. या गोळीबारात एकाला कंठस्नान घालण्यात यश आले असून एक पोलिसही यात शहीद झाला आहे. मात्र गोळीबाराच्या आवाजाने पॅरिसमध्ये घबराट निर्माण झाली होती. सेंट डेनिस येथील इमारती पोलिसांनी खाली करायला लावल्या असून परिसराला पोलिसांनी चोहोबाजूंनी वेढा घातला आहे.