लोकलवर दगडफेक, तरुणाच्या जबड्याला गंभीर दुखापत, डोळा बचावला

लोकलवर दगडफेक, तरुणाच्या जबड्याला गंभीर दुखापत, डोळा बचावला

मुंबई लोकल होणाऱ्या विकृत दगडफेकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलवर झालेल्या दगडफेकीत अंबरनाथच्या एका तरुणाच्या जबड्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि नाहूर स्थानक दरम्यान दगडफेकीची घटना घडली.

30 वर्षीय आदिल शेख 12 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कुर्ल्याहून अंबरनाथला निघाला होता. त्याचवेळी मुलुंड ते नाहूर स्थानकादरम्यान अज्ञाताने एक दगड लोकलच्या दिशेने भिरकावला. तो दगड थेट आदिलच्या जबड्याला लागला. अचानक झालेल्या प्रहाराने आदिलच्या जबड्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुदैवाने नेम थोडक्यात चुकल्याने आदिलचा डोळा निकामी होता होता वाचला. या प्रकरणी अंबरनाथ रेल्वे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *