बारावी आॅक्टोबर परीक्षेचा आज निकाल

बारावी आॅक्टोबर परीक्षेचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २0 नोव्हेंबर रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.

www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या ठिकाणी विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना २0 नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता महाविद्यालयात गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर ३0 नोव्हेंबरपर्यंत संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागेल. मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. पुणे मंडळ 0२0 ६५२९२३१७ आणि मुंबई मंडळ 0२२ २७८९३७५६, २७८८१0७५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *