ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

अजूबा, राम तेरी गंगा मैली, गांधी, आणि दिल यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांत उत्स्फूर्त अभिनयाने अनेक पात्रं अजरामर करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज (सोमवार) निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

जाफरी यांनी हिंदीसह अनेक हॉलिवूड चित्रपटांतही विविध भूमिका साकारल्या. अनेक भूमिका ठळकपणे साकारत जाफरी यांनी प्रेक्षकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. मनात घर करून आहेत.

1980 ते 90 च्या दशकातील गांधी, हीना या चित्रपटांतील जाफरी यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. विशेषतः राजकुमार यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. जाफरी यांच्या पत्नी अभिनेत्री-लेखिका मेहरुनिमा (माधुरी जाफरी) यांच्याशी 1965 मध्ये घटस्फोच झाला. जाफरी यांच्या मागे मीरा, जिआ आणि सकीन या तीन मुली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *