राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली सुरत तुरुंगात असलेले पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (पास) समन्वयक हार्दिक पटेल यांना शुक्रवारी दिलासा मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळताना या प्रकरणाचा दीड महिन्यात तपास पूर्ण करण्याचे निर्देश गुजरात पोलिसांना दिले. त्यामुळे हार्दिक पटेल यांना पुढील सुनावणीपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश जगदीश सिंह खेहार आणि न्यायाधीश आर. बानुमथी यांच्या खंडपीठाने सुरत पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतरच जामीन अर्जावर विचार होऊ शकतो, असे सांगितले.