केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पापूर्वी लक्ष्य पूर्तीसाठी पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात (एक्साईज ड्युटी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डीझेलवरील ही वाढ शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक संपताच केंद्र सरकारने महागाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पेट्रोलवरील अधिभार 1 रुपया 60 पैसे प्रती लिटर आणि डिझेलवरील अधिभार 40 पैशांनी वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात सरकारने पेट्रोल-डिझेलच्या अधिभारात पाचव्यांदा वाढ केली आहे. सरकारने शुक्रवारी रात्री घेतलेल्या निर्णयामुळे साधारण पेट्रोलवरील अधिकार 5.46 वरून 7.06 रुपये प्रती लिटर झाला आहे. तर, डिझेलवरील अधिभार 4.26 रुपयांवरून 4.66 रुपये प्रती लिटर झाला आहे.