सून व तीन नातवंडांच्या मृत्यूप्रकरणी माजी खासदाराला अटक

सून व तीन नातवंडांच्या मृत्यूप्रकरणी माजी खासदाराला अटक

सून आणि तीन नातवंडांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सिरचिलैया राजैया यांच्यासह त्यांची पत्नी माधवी आणि मुलगा अनिल कुमार यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Anil kumarराजैया यांची सून एस. सारिका आणि अभिनव (७) आणि जुळे आयान व श्रीयान (३) यांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शोभन कुमार यांनी सांगितले.

सारिका यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी राजैया यांच्याविरोधात सारिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि तीन मुलांच्या हत्येप्रकरणी विविध कलमांखाली अटक केली आहे. या तिघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *