ऐश्वर्या, माधुरीपेक्षाही सोनम जास्त सुंदर – सलमान

बॉलिवूड दबंग खानच्या आयुष्यात अनेक सुंदर अभिनेत्री आल्या. त्यापैकी सलमानसाठी सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय असेल, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. मात्र, त्याच्यासाठी सर्वात सुंदर अभिनेत्री सोनम कपूर असल्याचे त्याने सांगितले आहे.

‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान आणि सोनम कपूर दिल्लीत असतांना त्याने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे.

ऐश्वर्या आणि माधुरीबरोबर सोनमची तुलना केली जात असून याबद्दल सोनमला विचारण्यात आले असता तिने सांगितले की, ‘मी अनिल कपूरची मुलगी असल्यामुळे नेहमी अशी तुलना केली जाते, मात्र, हे चुकीचे आहे. त्या माझ्यापेक्षा अधिक सुंदर अभिनेत्री आहेत’, असे तिने सांगितले.

सोनमच्या या बोलण्यावर सलमानने ऐश्वर्या आणि माधुरीपेक्षा अधिक सुंदर आणि हुशार अभिनेत्री सोनम असल्याचे सांगत सोनमची स्तुती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *