धुळ्यात नाण्यांचा खच कायम, हायवेवर वाहतुकीचा खोळंबा

धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी पडलेला नाण्यांचा खच दुसऱ्या दिवशीही तसाच पडून आहे. नाणी अद्यापही उचलण्यात न आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

एक रुपयाची नाणी बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा नरडाणा गावाजवळील महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात ट्रकमधील नाण्यांचे 20 बॅरल खाली पडले  आणि रस्त्यावर नाण्यांचा खच पसरला.

dhule 3
20 बॅरल मधून पडलेली साधारण 22 लाखांची ही कच्ची नाणी अजूनही महामार्गावर तशीच पडून आहेत. नाण्यांचा खच पडल्याने महामार्ग प्राधिकरणाने सध्या या ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरु ठेवली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.

नाणी बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरिअल घेऊन जाणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या 31 बॅरलपैकी 20 बॅरल पडल्याने महामार्गावर पैसेच पैसे झाले होते. हा ट्रक बंगलोरहून नोएडाच्या दिशेने जात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *