मुंबई पोलिसांचा प्रताप, पोलिस ठाण्यात युगूलाला मारहाण

मुंबई पोलिसांचा प्रताप, पोलिस ठाण्यात युगूलाला मारहाण

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात एका युगूलाला अमानूष मारहाण करतानाचा मुंबई पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पिडीत तरुणी पोलिसांना सोडण्याची विनवणी करताना ऐकू येत असून पोलिसांनी या युगूलाला पोलिस ठाण्यात का आणले होते, मारहाणीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेेले नाही.

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबररोजी एका युगूलाला पोलिस ठाण्यात आणले गेले होते. या युगूलाला पोलिसांनी अत्यंत अमानूषपणे मारहाण केली असून हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. या व्हिडीओत पिडीत तरुणी पोलिसांकडे विनवणी करत असल्याचे दिसते. या युगूलाला पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरले असून मारहाणीमुळे मुलीच्या तोंडातून रक्त आल्याचे या व्हिडीओतील संभाषणावरुन स्पष्ट होते. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओवर सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलिस आयुक्त जावेद अहमद संबंधीतांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *