चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंबरनाथमधून (Ambernath) विक्री करण्यासाठी अपहरण केलेल्या 25 दिवसाच्या बालकाचा शोध पोलिसांनी लावला. तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार तासात पोलिसांनी (Police) चार आरोपी महिलांना जेरबंद करून 25 दिवसाच्या बालकाला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या तस्करीचे रॅकेट आणि चिमुकल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथमधील सदरील घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली होती. मुलाचे अपहरण झाल्यानंतर आई-वडिलांसह नातेवाईकांनी या बालकाचा शोध घेतला. परंतु नवजात बाळ सापडून न आल्यानं अखेर आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. याच तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत महिला आरोपींना ताब्यात घेतलं. संतोष वाघे यांचे नवजात बाळ एका मुक्या महिलेने हिसकाहून पळ काढला होता. आई-वडिलांनी या बालकाचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे सदरील बाळ हे एका महिलेला विक्री देखील करण्यात आले होते. परंतु, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर ते अंबरनाथ मार्गावर शोध घेतला. त्यावेळी, अंबरनाथ रेल्वे स्थानकावरुन सदरील बाळाला महिलेकडून ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

दरम्यान, अटक केलेल्या महिलांची मुले चोरण्याची टोळी आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान चोरी केलेले बाळ हे गुजरातला पाठविले जाणार होते, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यामुळे या टोळीचे गुजरात कनेक्शन नेमकं काय याचा देखील तपास केला जातोय. मात्र, या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी देखील अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

डंपिंग ग्राऊंडवर कर्मचाऱ्याला मारहाण

डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या मारहाणीचे प्रकरण ताजे असताना भाजपा पदाधिकाऱ्याकडून डंपिंग ग्राउंड कर्मचाऱ्याला भाजपा आमदार सुलभा गायकवाड समोरच मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डा डम्पिंग ग्राउंडची भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून पाहणी दौरा दरम्यान राडा झाला. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे नसल्याने आमदारांसह भाजप पदाधिकारी संतापले. त्यानंतर, डम्पिंग ग्राउंडवरील सुपरवायझर किरण रसाळ यांच्यावर संताप केला व्यक्त, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांच्याकडून सुपरवायझर किरण रसाळला शिवीगाळ करत मारहाण करम्यात आली. यावेळी, सुपरवायझर दारूच्या नशेत असल्याचा सांगत विजय जोशी यांच्याकडून आरोप करत ही मारहाण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *