पुणे शहरातील ४६ वाहतूक सिग्नल बंद; वाहनचालकांना वाहतूक कोंडीची समस्या,स्मार्ट प्रीपेड मीटरचा फटका

‘महावितरण’ आणि पुणे महापालिकेने नव्याने बसविलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील ४६ वाहतूक सिग्नल शुक्रवारी सकाळी बंद पडले. त्यामुळे शहरातील अनेक प्रमुख चौकांमधील वाहतूक विस्कळित झाली. सकाळी आठ वाजल्यापासून सिग्नल बंद असल्याने वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला. यातील सहा सिग्नल पुन्हा सुरू करण्यात आले असून, ४० सिग्नल अद्याप बंद आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह अतिरिक्त ६०० पोलिसांना रस्त्यावर तैनात करावे लागले.

विविध चौकांमधील सिग्नल बंद

शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शहरातील विविध चौकांमधील सिग्नल बंद असल्याचे निदर्शनास आले. चंदननगर, हडपसर, येरवडा, कात्रजसह मध्यवर्ती भागातील अनेक चौकांमध्ये याचा परिणाम झाला. कार्यालये, शाळा आणि अन्य कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा फटका बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *