नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा; मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द?

 मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीनंतर माहीम ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

स्थानक – माटुंगा ते मुलुंड

मार्ग – अप आणि डाउन धीमा

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५

परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही लोकलफेऱ्या २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन लोकलफेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकलफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि बेलापूर-उरण मार्गावरील लोकलफेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – माहीम ते मुंबई सेंट्रल

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ -शनिवारी रात्रीनंतर १२.५० ते रविवारी पहाटे ४.२५

परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

विलंबावर रेल्वेकडे कागदोपत्री उत्तरांची मागणी

बोरिवली-वलसाड मेमूच्या (क्र. ६९१३९) सातत्यपूर्ण विलंबाचा प्रश्न कायम असताना पालघर स्थानकावरील तिच्या सार्वजनिक आणि कार्यरत वेळापत्रकात ११ मिनिटांचा फरक असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या उत्तरातून समोर आल्याचा दावा डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केला आहे. विलंबाची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती मिळविण्यासाठी संस्थेने माहितीच्या अधिकाराचा मार्ग स्वीकारला आहे. संस्थेच्या वतीने हितेश सावे यांनी या प्रश्नाचा टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला. सुरुवातीला गाडी क्रमांक ६९१३९ची उपलब्ध धावण्याची माहिती तपासण्यात आली. त्यातून पालघरच्या दिशेने येताना विरार, वैतरणा, सफाळे, केळवा रोड आणि पालघर या स्थानकांवर विलंब वाढत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा संस्थेने केला. त्यानंतर ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *