भारताच्या रिअल इस्टेट मार्केट व्यवसाय किंचीतसा मंदवला आहे. भारताच्या निवासी स्थावर मालमत्ता बाजाराची जलद वाढ काही प्रमाणात घटली आहे. 2026 च्या 9 महिन्यांत घरांची एकूण विक्री स्थिर राहिली. मात्र, नवीन प्रकल्पांचे प्रक्षेपण विक्रीपेक्षा सातत्याने जास्त होते. घरांच्या विक्रीसाठी लागणारा वेळ वाढला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) सर्वाधिक दबावाखाली असल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळूरु हे या शहरांमध्ये निवासी संकुलांना मोठी मागणी असते. मात्र, याच शहरांमध्ये घर विक्रीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
भारतातील प्रमुख शहरांच्या निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठांमध्ये, खरेदीदार पूर्वीपेक्षा अधिक माहितीपूर्ण निर्णय घेत आहेत. नाईट फ्रँक इंडिया अहवालानुसार 2026 च्या पहिल्या नऊ महिन्यांत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये एकूण 2,58,238 घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास स्थिर राहिली आहे.
नवीन घरांच्या विक्रीपेक्षा नवीन घरांचे उद्घाटन जास्त आहे.
अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान 279,899 नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. नवीन घरांच्या उपलब्धतेत 4 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सलग 16 व्या तिमाहीत नवीन घरांच्या विक्रीपेक्षा त्यांची उपलब्धता जास्त राहिली आहे. याचा थेट परिणाम उपलब्ध घरांच्या साठ्यावर होत आहे. अहवालानुसार, घर विकण्यासाठी लागणारा सरासरी वेळ (क्वार्टर्स टू सेल), 2025 च्या तिसऱ्या तिमाहीतील 5.8 तिमाहींवरून 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत 6.1 तिमाहींपर्यंत वाढला आहे. ही सलग चौथी तिमाही वाढ असून 2023 च्या दुसऱ्या तिमाहीनंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.
घरांची विक्री पूर्णपणे थांबलेली नाही, परंतु मालमत्ता विकायला जास्त वेळ लागत आहे. उपलब्ध घरांचा साठा वाढत असला तरी विक्रीचा वेग मंदावला आहे.
एनसीआरमधील विक्रीत 11 टक्क्यांची घट
देशातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत, दिल्ली -एनसीआरमधील स्थावर मालमत्ता बाजारपेठ सर्वाधिक दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत एनसीआरमध्ये 35,574 घरांची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11 टक्के घट आहे. नाईट फ्रँकच्या मते, देशातील आठ प्रमुख बाजारपेठांपैकी एनसीआर ही एकमेव बाजारपेठ आहे. येथे निवासी घरांच्या विक्रीत घट झाली.
एनसीआरमधील विक्रीतील घसरणीचा परिणाम विशेषतः प्रीमियम सेगमेंटमध्ये जाणवला. 5 ते 10 कोटीच्या रेंजमधील घरांची विक्री 39 टक्केने घटली आहे. फक्त 4,033 युनिट्स विकले गेले आहेत. .याच कालावधीत, या सेगमेंटमध्ये 5,002 युनिट्स लॉन्च करण्यात आली, म्हणजेच या किंमत श्रेणीत विकल्या गेलेल्या घरांपेक्षा जास्त नवीन घरे लॉन्च करण्यात आली. अहवालानुसार, एनसीआरमधील न विकल्या गेलेल्या घरांच्या साठ्यापैकी 57 टक्के वाटा गुरुग्रामचा होता.
मुंबई – बंगळूरुमध्ये विक्रीत वाढ
शहरांनुसार निवासी बाजारपेठेचे चित्र बदलत आहे. मुंबईत 72,804 घरांची विक्री झाली. मुंबईत घरांच्या विक्रीत 1 टक्के वाढ झाली आहे. बंगळूरमध्ये घरांच्या विक्रीत 5 टक्के वाढ झाली. 43,140 घरांची विक्री झाली. कोलकातामध्ये घरांच्या विक्रीत 4 टक्क, हैदराबादमध्ये 2 टक्के तर अहमदाबादमध्ये 2 टक्केने वाढ झाली आहे. पुण्यातील विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखीच राहिली.
घरांच्या किंमतीत कोणतीही घट नाही
एकूणच आकडेवारीवर नजर टाकली असता. देशभरात घरांची मागणी कमी झालेली नाही. बाजारपेठ शहरांनुसार आणि किंमत विभागांनुसार वेगवेगळ्या गतीने वाटचाल करत आहे. 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे. अहवालानुसार, परवडणाऱ्या आणि कमी किंमतीच्या विभागांमध्ये सर्वात मोठा बदल दिसून येतो. 50 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या घरांची विक्री 14 टक्केने घटून 47,660 युनिट्सवर आली. 50 लाख ते 1 कोटी दरम्यान किमतीच्या घरांची विक्री देखील 5.9 टक्केने घटली. याउलट, उच्च श्रेणीतील घरांची मागणी मजबूत राहिली आहे. 1 कोटी ते 2 कोटी दरम्यान किमतीच्या घरांची विक्री 6.8 टक्के ने वाढून 77,087 युनिट्सवर पोहोचली. 2 कोटी ते 5 कोटी दरम्यान किमतीच्या घरांची विक्री 19.4 टक्केने वाढली आहे. एकूण निवासी विक्रीमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांचा वाटा 50 टक्केवरून 55 टक्केपर्यंत वाढला आहे.
