ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज (8 ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला. आज सायंकाळी 4 वाजता पुण्यात नाना पाटेकर यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. पुण्याजवळील डोणजे गावातील नानाची वाडी येथे नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याच डोणजे गावातील ग्रामस्थ नाना पाटेकरांच्या निधानाने गहिवरुन गेले. तसेच नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, अशी माहितीही नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात म्हणाले.
नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात काय म्हणाले?
नानांच्या जाण्याने आमच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. नानांचा परिवार संपूर्ण महाराष्ट्र आहे. नानासाहेबांचे स्वप्न होते माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार सुखी राहिलं पाहिजे. नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली होती. माझ्या शेतामध्ये मोठी झालेली लाकडं, माझ्या अंत्यविधीसाठी वापरा, असं म्हणाले होते. आपल्याच शेतात अंत्यविधी करा, असंही नाना पाटेकर म्हणाले होते, अशी माहिती गणेश थोरात यांनी दिली. तसेच नाना पाटेकर नुकतेच दुष्काळ दौरा करणार होते, ती इच्छा अपूर्ण राहिली, असंही गणेश थोरातांनी सांगितले. आज संध्याकाळी नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत, असं गणेश थोरात म्हणाले.
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही. गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याने एका फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते; तिथे ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांना ‘कार्डियाक मसाज’ देऊन रुग्णालयात आणले असता, तेथील वैद्यकीय पथकाने पहाटे 5.20 वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण ‘मेडिको-लीगल’ (वैद्यकीय-कायदेशीर) स्वरूपाचे असल्याने आज त्यांचे शवविच्छेदन केले जाईल.
नाना पाटेकर यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी सरकार कायम आपल्यासोबत- देवेंद्र फडणवीस
नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गहिवरले. नानांच्या निधनाची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीसांनी मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच नाना पाटेकर यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी सरकार कायम आपल्यासोबत असेल, असेही सांगितले. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कसदार कलाकार आणि अत्यंत उत्तम माणूस असलेल्या नाना पाटेकर यांचे अचानक जाणे ही एक मोठी हानी आहे. ‘क्रांतीवीर’ ते ‘नटसम्राट’ अशा विविध चित्रपटांतून त्यांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही, तर त्यांना वैचारिक दृष्टीही दिली. तसेच ते एक देशभक्त म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सीमावर्ती भागात आपल्या सैनिकांसोबत काम केले आणि ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात दुष्काळ निवारणाचे कार्य केले. विविध गावांमध्ये जलसंधारणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने अनेकांना प्रेरणा दिली आणि त्यामुळे त्यांना लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
