आठवडाभर फिरायला जाऊया; नाशकात महिला प्रोफेसरला जाळ्यात ओढलं, आक्षेपार्ह व्हिडिओवरुन माजी विद्यार्थ्याकडून ब्लॅकमेल

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका माजी विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये ‘रोमिओगिरी’ करत महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खासगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने प्राध्यापिकेकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (रा. अंबड, जालना) याला गंगापूर पोलिसांनी अटक केली.

संशयित चेतन हा पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात पूर्वी शिक्षण घेत होता. काही कालावधीनंतर प्राध्यापिकेची बदली झाल्याने संशयिताने पुन्हा त्यांच्याशी संपर्क वाढवला. विश्वास संपादन करून त्याने प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढल्याचा आरोप फिर्यादीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *