पश्चिम रेल्वेवर होतंय आणखी एक टर्मिनस, मार्च 2028 पर्यंत सुरू होणार? वाचा कुठंय लोकेशन

मुंबईत लोकसंख्येत वाढ झाली आहे. अनेकजण नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले आहेत.  त्यामुळं रेल्वेवरील भारदेखील वाढला आहे. लोकलची क्षमता कमी आणि प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसंच, लांब पल्ल्याच्या गाड्याबाबतही झालं आहे. मुंबईत सध्या 7 रेल्वे टर्मिनस कार्यरत आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी येथे रेल्वे टर्मिनस कार्यरत होणार आहे. पण त्याचबरोबर आणखी एक रेल्वे टर्मिनसचा प्रस्ताव आहे. मार्च 2028 पर्यंत हे टर्मिनस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वसई रोड रेल्वे टर्मिनसच्या कामासाठी विविध कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. सुमारे 150.25 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या टर्मिनसमुळं पश्चिम रेल्वेवरील भार हलका होणार आहे.

जोगेश्वरीचे गुड्स यार्ड स्थलांतरित करुन ते वसई रोड-दिवा विद्यामान कोर्ड लाईन आणि नायगाव -जुचंद्रा प्रस्तावित कॉर्ड लाइनदरम्यान विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी सुमारे 850 मीटर लांब आणि 27 मीटर रुंद असलेल्या या यार्डमध्ये प्रत्येकी 800 मीटर लांबीच्या दोन गुड्स लाइन असतील.

दक्षिण दिशेला रॅम्प तसेच व्यावसायिक आणि प्रशासकीय कामांसाठी इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळं मालगाड्यांची वाहतूक प्रवासी मार्गापासून वेगळी ठेवण्यात मदत होणार आहे. दरम्यान टर्मिनसच्या 1,200 मीटरच्या प्लॅटफॉर्म भिंतीपैकी 500 मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

कसं असेल टर्मिनस

वसई रोड टर्मिनसवर 12 ट्रेन हाताळणी करण्याची क्षमता असेल. सुमारे 4.5 हेक्टर विद्यमान रेल्वे जागेवर 1.8 मार्ग किमी आणि 5.1 ट्रॅक किमीची सुविधा विकसित केली जाणार आहे. त्यामुळं वाढत्या प्रवासी सेवांसोबत मालवाहुकीसाठी स्वतंत्र्य पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *