पितृपक्ष सुरू आहे. अशावेळी पितृपक्षात सोनं खरेदी करावं की नाही याबाबत संभ्रम आहे. मात्र तुम्ही या काही दिवसांत सोनं खरेदी करण्याचा विचार करताय. तर आज तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत.
सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 4,170 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पोहोचला आहे. तर, चांदी 61. 60 डॉलर प्रति औंसच्या जवळपास व्यवहार करत आहे. तर देशांतर्गंत मार्केटमध्ये सोन्याचा वायदा भाव 1,49,450 लाख रुपये असून चांदीचा भाव 2,26,800 लाख रुपयेच्या जवळपास आहे.
सोन्याच्या वायद्याची सुरुवातीला तेजीत होता. MCX वर सोन्याचा वायदा 807 रुपयांच्या तेजीने 1,51,197 रुपयांच्या भावाने बाजार उघडला. मात्र नंतर सोन्याचा भाव 1,50,390 रुपयांवर स्थिरावला. त्यामुळं सोन्याच्या दरात 965 रुपयांची घट झाली असून 1,49,425 रुपयांवर व्यवहार करत आहे.
आज चांदीच्या वायद्यांची सुरुवात दमदार झाली होती. एमसीएक्सवरील प्रमुख डिसेंबर करार ₹23 ने वाढून ₹225,990 वर उघडला. मागील बंद भाव ₹225,877 होता. ही बातमी लिहिताना, हा करार ₹923 ने वाढून ₹226,800 वर व्यवहार करत होता. चांदीच्या वायद्यांनी यावर्षी ₹420,048 प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला.
गेल्या आठवड्यात, मजबूत झालेल्या अमेरिकी डॉलरने आणि वाढलेल्या बॉण्ड यील्ड्सने सोन्यावर दबाव आणला, ज्यामुळे नफावसुली झाली. यापूर्वी, अमेरिकेच्या रोजगाराच्या कमकुवत आकडेवारीमुळे आणि चलनविषयक धोरणाबद्दलच्या अपेक्षांमुळे सोन्याला दरावर परिणाम झाला होता. गेल्या आठवड्यात COMEX वरील डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या वायद्यांमध्ये 3.7% घसरण होऊन ते प्रति औंस $4,162.3 वर बंद झाले, तर चांदीच्या वायद्यांमध्ये 6.7% घसरण होऊन ते प्रति औंस $60.41 वर आले.
