रस्ता ओलांडताना टँकरची धडक, माहिम कॉजवेवर महिलेचा करुण अंत, लेकरं जखमी, स्थानिकांचा रास्ता रोको

 माहीम कॉजवे परिसरात पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या दोन मुलांसह तिघे जण जखमी झाले, त्यानंतर या अपघातप्रवण चौकातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांना १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

माहिम कॉजवेजवळ अपघात

२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान अंजली खारवा आपल्या कुटुंबासह एल. जे. रोड ओलांडत असताना एका टँकरने त्यांना धडक दिली आणि त्यांच्या अंगावरुन टँकर गेला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची मुले, तसेच स्थानिक रहिवासी रोहिणी सुर्वे जखमी झाल्या. रोहिणी सुर्वे यांच्या पायावर रहेजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या अजूनही अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *