मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग – अप आणि डाउन धीमा

वेळ – स. १०.५५ ते दु. ३.५५

परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – स. ११.०५ ते दु. ४.०५

परिणाम – सीएसएमटी ते बेलापूर / पनवेल दरम्यान धावणाऱ्या आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशीदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते राम मंदिर

मार्ग – अप जलद आणि पाचवी मार्गिका

वेळ – सकाळी १० ते दुपारी ४

परिणाम – ब्लॉक वेळेत बोरिवली ते अंधेरी दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर आणि पाचव्या मार्गावरील गाडया डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
सुट्टीच्या वेळापत्रकाचा खरेदीमध्ये अडथळा

यंदा रविवारी , ११ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. उत्सवापूर्वीचा रविवार, ४ ऑक्टोबरला आहे. रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे अनेक लोकल रद्द राहतात तर, अनेक सुमारे २० मिनिटे विलंबाने धावत असतात. रविवारी एसी लोकल फेऱ्यांची संख्या ही कमी असते. गर्दीमुळे प्रवाशांना रविवारी खरेदीचे सामान घरी नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी गांधी जयंती, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे रविवारची ब्लॉक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी दुपारपासूनच मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. रेल्वे स्थानकांवर लोकल उपलब्ध नसल्याने प्रवासी ताटकळत होते. विलंबाने लोकल धावत असल्याने लोकल प्रवाशांनी भरून येत होत्या. आधीच भरून आलेल्या लोकलमधील फलाटावर प्रवाशांची भर पडली. यामुळे काही प्रथम श्रेणीत प्रवेश करून प्रवास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *