साताऱ्यातील 19 वर्षीय हर्षदाच्या मृत्यूचा अखेर उलगडा, जन्मदात्यानेच निर्घृणपणे संपवलं; बापानेच सांगितलं धक्कादायक कारण

सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेच्या हत्येचा कालच पर्दाफाश झाला होता. आता दुसऱ्या घटनेचीही उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. खंडाळा तालुक्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावर आढळलेला मृतदेह हवेली तालुक्यातील जांभुळवाडी गावातील हर्षदा हणमंत जाधव (वय 19) या तरूणीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. जन्मदात्यासह चुलत चुलत्यानेच तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

हातानं तोंड व नाक दाबून हत्या

हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करायची. वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरायची. व्यसन करायची. घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी द्यायची. तिच्या अशा वागण्याला आणि त्रासाला कंटाळून वडील तसेच चुलत चुलत्याने तिला हॉटेलला जेवायला जायचं असल्याचं सांगून गाडीतून हॉटेलला नेलं. डोळ्यात आणि तोंडात चटणी घालून हाताने तोंड व नाक दाबून तिची हत्या केल्याचा घटनाक्रम तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हणमंत दामोदर जाधव रा. जांभुळवाडी (रा. आंबेगांव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे) आणि चुलत चुलता बाळू अंकुश जाधव (रा. प्रगतीनगर-इंदोरी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *