गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत मुंबईकरांनी शुक्रवारी गणरायांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आजपासून पुन्हा मुंबईकरांचा नित्य दिनक्रम सुरु झाला आहे. असं असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र अजूनही गणेशोत्सवासंदर्भातील व्हिडीओ आणि रिल्स फिडवर येताना दिसत आहेत. गणपती बाप्पा घरी परतल्यानंतरच्या मजेदार एआय व्हिडीओंपासून ते पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार यासंदर्भातील पोस्ट अशा अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. अशातच अनंत अंबानींचाही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ गणेशोत्सवाच्या शेवटच्या काही दिवसांमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुंबईतील एका गणेशोत्सव मंडळाला पुढल्या वर्षी गणपतीसाठी सोन्याचा मुकुटू बनवून देण्याचं आश्वासन दिल्याचं दिसत आहे.
“आजपर्यंत झालेल्या अपमानाचा हा विषय”
इंडिया आघाडीकडून देशभर या विषयावर रान पेटवलं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही इंडिया आघाडीसोबत जाणार आहात का, असा प्रश्न राज यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “आपण मुद्द्यापासून भरकटतोय, हा विषय आहे एसआयआरचा आहे, आजपर्यंत झालेल्या आमच्या अपमानाचा हा विषय आहे. निवडणुकीत आम्ही सगळी मेहनत घेत आलो, पण जर अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत छेडछाड केली जाणार असेल तर ती लोकशाहीला काळिमा आहे. हा मतदारांच्या मतदानाचा अपमान आहे.”
दरम्यान, “२०१७ मध्ये मी ईव्हीएमविरोधात भूमिका घेऊन मी अनेक नेत्यांना भेटलो होतो. ४ तारखेच्या मोर्च्यात आम्ही यावर सविस्तर बोलू. सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करतो की, हा मोर्चा कोणत्या राजकीय पक्षाविरोधातील नाही. मागील काही वर्षांत निवडणूक आयोगाकडून जो कारभार सुरू आहे त्याविरोधातील हा मोर्चा आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं,” असंही राज ठाकरे म्हणाले.
