आजपर्यंत झालेल्या अपमानाचा हा विषय; राज ठाकरेंचा संताप, ४ तारखेच्या मोर्च्याविषयी मोठी घोषणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी SIR प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत मोर्च्याची वेळ आणि ठिकाण याविषयी माहिती दिली. यावेळी Raj Thackeray यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.

Raj Thackeray यांनी मोर्च्याबाबत माहिती देताना म्हटलं की, “४ ऑक्टोबर रोजी मोर्चा निघेन. भायखळ्यातील क्रुडास कंपनी गेट येथून हा मोर्चा मुंबई महापालिकेसमोर जाईल आणि तिथं सभेत रुपांतर होईल. ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. निवडणूक आयोगाविरोधातील हा मोर्चा असून मोर्चात कोणाच्याही हातात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याने प्रत्येकाच्या हातात तिरंगा हवा,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच इतर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही फोन करून या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *