विरार परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खाडी रानगाव येथील कळंब बीचवर (Kalamb Beach) पर्यटनासाठी आलेला 24 वर्षीय तरुण समुद्राच्या वेगवान लाटांमध्ये बेपत्ता झाला आहे. सत्य विश्वकर्मा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) कंपनीत कार्यरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्य विश्वकर्मा हा शुक्रवारी दुपारी त्याचा भाऊ शिवा विश्वकर्मा याच्यासोबत नालासोपारा (Nalasopara) येथून जवळच असलेल्या कळंब बीचवर फिरण्यासाठी आला होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास सत्य समुद्राच्या पाण्यात उतरला होता. त्याच वेळी खाडीच्या चॅनेलमध्ये ‘रिव्हर्स करंट’ (Reverse Current) म्हणजेच पाण्याचा अत्यंत वेगवान उलटा प्रवाह निर्माण झाला. या पाण्याचा अंदाज न आल्याने सत्य विश्वकर्मा पाण्याच्या प्रवाहासोबत समुद्रात वाहून गेल्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे
