राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार

राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला असतानाच शेतकऱ्यांच्यादृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून शनिवारी हा निर्णया जाहीर करण्यात आला. त्यानुसार राज्यातील 265 तालुक्यात  दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आहे. या निर्णयामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या शेतकरी (Farmers) आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पालकमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक दिवस दुष्काळी दौरा केला होता. तर दुसरीकडे विरोधकांनी दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी लावून धरली होती. आदित्य ठाकरे हे नुकतेच दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले होते. शरद पवारही लवकरच दुष्काळी भागाचा दौरा करणार होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने आता दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

 दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?

* जमीन महसुलात सूट
* पीक कर्जाचे पुनर्गठन
* शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
* कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
* शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
* रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
* आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स
* टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
* शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
* जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करणार (Chara Chavni)
* जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
* पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
* पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश
* पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *