टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार शुभमन गिलला दुखापत, रविवारी पहिला सामना खेळणार की नाही?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND VS WI ) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. 27 सप्टेंबरला सीरिजमधील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार असून यासाठी टीम इंडिया मैदाना दोन दिवसांपूर्वीच तेथे दाखल झाली आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरम येथे पोहोचताच सरावाला सुद्धा सुरुवात केली. मात्र सामन्याच्या 48 तासांपूर्वी टीम इंडियातून एक वाईट बातमी समोर येतेय. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव करत असताना भारताचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकलेला बॉल थेट गिलच्या उजव्या कोपऱ्याला लागला.त्यानंतर शुभमन गिल हा खूप वेदनेत दिसला आणि लगेचच नेट्स सेशन सोडून बाहेर पडला.

शुभमन गिलला नेट्समध्ये दुखापत झाल्यावर त्याला मैदानातून लगेचच बाहेर नेण्यात आले आणि फिजीओला बोलवण्यात आले. शुभमन गिलवर जवळपास 20 मिनिटं उपचार करण्यात आले. तसेच त्याच्या उजव्या कोपऱ्याला बॉल लागलेल्या ठिकाणी पट्टी बांधण्यात आली. मग शुभमन हा डगआउटमध्ये आराम करत असताना वरिष्ठ रोहित शर्मा स्वतः शुभमनकडे पोहोचला. मात्र या सगळ्यात सकारात्मक बाब म्हणजे वेदना कमी झाल्यानंतर सत्र संपण्यापूर्वी गिल ‘थ्रो-डाउन्स’चा सामना करण्यासाठी पुन्हा नेट्समध्ये परतला.

रोहित आणि विराटने नेट्समध्ये केली फटकेबाजी : 

कर्णधार शुभमन गिल दुखापत होण्यापूर्वी काहीवेळ आधी अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे बराचवेळ नेट्समध्ये फलंदाजी करत होते. अफगाणिस्तानविरुद्धची मागील मालिका न खेळल्यानंतर कोहली चांगल्या लयीत दिसला. रोहित आणि विराट या दोघांनीही भारतीय गोलंदाजांविरुद्ध तसेच स्थानिक नेट गोलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट फटके मारले.

टीम इंडियाचा गोलंदाजी कोच मोर्ने मोर्केलने ड्रेसिंग रूममधील वातावरणाची तारीफ केली. मॉर्केल म्हणाला की, ‘शुभमनने आतापर्यंत कर्णधारपदाची जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली आहे, परंतु संघातील वरिष्ठ खेळाडूंची भूमिका नेहमीच अत्यंत महत्त्वाची असते असे मला वाटते. अनेक युवा खेळाडूंना काही विशिष्ट वरिष्ठ खेळाडूंशी संवाद साधणे अधिक सोयीचे वाटते. रोहित आणि विराट यांच्यासारख्या अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा आपल्याला मिळणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *