कल्पना खरातला परदेशबंदी, ‘ईडी’च्या गुन्ह्यात जामीन; अशोक खरातच्या कोठडीत वाढ, 30 सप्टेंबरला सुनावणी

 दैवी शक्ती, भविष्यवाणीतून भीती दर्शवून महिलांवर लैंगिक अत्याचारासह अनेकांची आर्थिक लूट ‘मनी ट्रेल’ करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात मुंबई न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. तर त्याची पत्नी कल्पना हिला या खटल्यात सशर्त जामीन मंजूर झाला असून तिला विनापरवानगी परदेशात जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. यासह प्रत्येक सुनावणीसह ‘ईडी’च्या चौकशीवेळी प्रत्यक्ष उपस्थितिचेही आदेश दिले आहेत.

अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध ‘ईडी’ने तीन हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्याने ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार केला असून, संशयितांमध्ये खरातसह अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अनिवाश वामन कांडेकर, मिलिंद दादासाहेब बनकर आणि खरातची पत्नी कल्पना अशोक खरात यांचा समावेश आहे. या गुन्ह्याच्या खटल्याची कार्यवाही सुरू असून, खटल्यात मंगळवारी (दि. २२) सुनावणी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *