महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांचं निधन, लोककला क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला, पारंपरिक बैठकीची लावणी आणि संगीत बारीच्या समृद्ध वारशाला आपल्या नृत्याने सजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि लावणी क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात असून अवघ्या सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सुरू असलेली त्यांची प्रदीर्घ झुंज त्यांची अपयशी ठरली.  वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

त्या मूळच्या अहिल्यानगरच्या आहेत. काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. गेल्या वर्षी त्यांना राज्य सरकारचा कला पुरस्कारही देण्यात आला होता. 50 हून अधिक वर्षे त्या या क्षेत्रात होत्या. केंद्र सरकारचा नाटक अकादमी पुरस्कार तसेच शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारही त्यांना मिळाला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य नगरमध्ये गेले. त्यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी पहिल्यांदा घुंगरू बांधले आणि लावणी क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा अधिक काळ पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांमध्ये गेला.

शकुंतला नगरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य लावणी कलेच्या संवर्धनासाठी आणि सन्मानासाठी वेचलं. पारंपारिक संगीत बारीमधील बैठकीची लावणी, शृंगारिक अदा, डोळ्यांतील भावमुद्रा आणि नजाकत यावर शकुंतलाबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या प्रत्येक अदाकारीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा ठसा उमटलेला असायचा.

केवळ पारंपारिक तमाशा किंवा संगीत बारीच्या मंचापुरते मर्यादित न राहता त्यांनी लावणीचा आदर आणि प्रतिष्ठा अभिजात रंगभूमीवर पोहोचवली. भूषण कोरगावकर यांच्या दिग्दर्शनाखालील ‘संगीत बारी’ या लोकप्रिय नाट्यरूप प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक शहरी प्रेक्षकांना आणि तरुण पिढीला अस्सल लावणीचा इतिहास व सौंदर्य दाखवून दिले.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *