‘…तर आज माझं मुलं जिवंत असतं, आम्ही त्याच दिवशी…’; IIT Bombay प्रकरणी साहिलच्या आईने सगळंच सांगितलं

आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी साहिलवर जातीवाचक शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. साहिलच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. तर, प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. साहिल वाकोडेच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया देताना माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या, असं म्हटलं आहे.

‘आयआयटी बॉम्बेमधील आत्महत्या प्रकरणाबाबत, मृत साहिल वाकोडे यांची आई सोनाली वाकोडे यांनी म्हटलं आहे की, “मी माझे मूल गमावले आहे. मी कोणत्या वेदनेतून जात आहे, याची मलाच जाणीव आहे. कृपया माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या. त्याच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्याला न्याय मिळावा, याची खात्री करा. दलित विद्यार्थीच का आत्महत्या करत आहेत?,’ असा सवालही त्यांनी केला.

साहिलच्या आईने पुढे म्हटलं की, ‘आम्ही त्याला मानसिक आधार दिला आणि सांगितले की, ‘तुझे भविष्य उज्ज्वल आहे बाळा, फक्त हे सहन कर’  तीच आमची चूक ठरली. जर आम्ही त्याला त्या दिवशी तिथून परत आणले असते, तर माझे मूल आज जिवंत असते. मला गुन्हे शाखेवर (क्राइम ब्रँच) विश्वास आहे. प्रशासन आणि संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलाला नक्कीच न्याय मिळेल.’

’13 तारखेला जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो होतो, तेव्हा त्याने मला सांगितले, ‘पप्पा, मला थोडा त्रास दिला जात आहे. माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली जात आहे.’ आम्ही त्याला केवळ मानसिक आधार दिला. ती आमची चूक होती. माझ्या मुलाला न्याय मिळावा, अशी मी कळकळीची विनंती करते,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साहिलच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसअगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले होते. त्यावेळी साहिलने त्याच्यावर प्राध्यापकांकडून छळ केल्या जात असल्याचे सांगितले होते. साहिल खालच्या जातीचा आहे असे म्हणून त्याचा छळ होत होता. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष कर असा सल्ला आई-वडिलांनी दिला. साहिलने आत्महत्या केली हे मुंबईला गेल्यावरच आई-वडिलांना कळाले. वास्तविक पाहता साहिलची काही चूक असेल तर प्रशासनाने कळवायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. यापूर्वीही तेथे दलितांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी साहिलची आजी शामलतात तायडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *