गॅस सिलेंडरच्या दरात 600 रुपयांपर्यंत सूट! महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात LPG चे दर पाहा

गॅस सिलेंडरच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण भागातील काही ठिकाणी 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरवर तब्बल 600 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. मात्र, ही कपात सरकारी पातळीवरून करण्यात आलेली नाही. काही गॅस एजन्सी आणि वितरकांकडून स्थानिक मागणी आणि उपलब्ध स्टॉकच्या आधारे ही सूट दिली जात आहे.

कमर्शियल सिलेंडर स्वस्तात का मिळतोय?

एप्रिल-मे महिन्यात आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कमर्शियल LPGच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. मात्र, आता बाजारातील पुरवठा पूर्वपदावर आला असून सिलेंडर सहज उपलब्ध होत आहेत. पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही ग्रामीण भागांमध्ये कमर्शियल LPGची मागणी तुलनेने कमी राहिली. त्यामुळे काही वितरकांकडे 19 किलोचे सिलेंडर स्टॉकमध्ये शिल्लक राहिले आहेत. हा स्टॉक कमी करण्यासाठी काही एजन्सी ग्राहकांना थेट डिस्काउंट देत असल्याचे News18 च्या एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

कुठे मिळतेय 600 रुपयांपर्यंतची सूट?

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत असा फरक पाहायला मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, काही एजन्सी सरकारी दरापेक्षा सुमारे 200 ते 600 रुपये कमी किमतीत 19 किलोचा सिलेंडर विकत आहेत. कुशीनगरमध्ये 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा अधिकृत दर सुमारे ₹2,946 असताना काही ग्राहकांना तो ₹2,400 ते ₹2,700 दरम्यान मिळत असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सूट तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेली दरकपात नाही. स्थानिक बाजारातील मागणी आणि उपलब्ध स्टॉकनुसार काही वितरकांकडून ही सवलत दिली जात आहे.

कोण वापरतात 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर?

19 किलोचा LPG सिलेंडर प्रामुख्याने व्यावसायिक वापरासाठी असतो. हॉटेल, रेस्टॉरंट, चहाचे किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल, मिठाईची दुकाने आणि कॅटरिंग व्यवसायांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये मागणी कमी असल्यास एजन्सींकडे सिलेंडरचा अतिरिक्त स्टॉक राहू शकतो. त्यामुळे काही ठिकाणी ग्राहकांना कमी दरात सिलेंडर उपलब्ध होत आहे.

घरगुती LPG सिलेंडरच्या दरात बदल नाही

दरम्यान, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच घरगुती ग्राहकांना सध्या या दरकपातीचा थेट फायदा मिळणार नाही. मुंबईत घरगुती LPG सिलेंडरचा दर ₹941.50 आहे. दिल्लीमध्ये तो ₹944, कोलकात्यात ₹968.50, तर चेन्नईमध्ये ₹947.50 आहे. 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या अधिकृत दरातही आज बदल झालेला नसून दिल्लीतील दर ₹2,747.50 आहे.

महाराष्ट्रातील LPG सिलेंडरचे शहरनिहाय दर (घरगुती LPG सिलेंडर — 14.2 किलो) 

  • अहिल्यानगर : ₹955.50
  • अकोला : ₹962.00
  • अमरावती : ₹975.50
  • छत्रपती संभाजीनगर : ₹950.50
  • भंडारा : ₹1,002.00
  • बीड : ₹967.50
  • बुलढाणा : ₹956.50
  • चंद्रपूर : ₹990.50
  • धुळे : ₹962.00
  • गडचिरोली : ₹1,011.50
  • गोंदिया : ₹1,010.50
  • मुंबई : ₹941.50
  • हिंगोली : ₹967.50
  • जळगाव : ₹947.50
  • जालना : ₹950.50
  • कोल्हापूर : ₹944.50
  • लातूर : ₹966.50
  • नागपूर : ₹993.50
  • नांदेड : ₹967.50
  • नंदुरबार : ₹954.50
  • नाशिक : ₹945.50
  • धाराशिव : ₹966.50
  • पालघर : ₹953.50
  • परभणी : ₹968.00
  • पुणे : ₹945.00
  • रायगड : ₹952.50
  • रत्नागिरी : ₹956.50
  • सांगली : ₹944.50
  • सातारा : ₹946.50
  • सिंधुदुर्ग : ₹956.00
  • सोलापूर : ₹949.50
  • ठाणे : ₹941.50
  • वर्धा : ₹1,002.00
  • वाशिम : ₹962.00
  • यवतमाळ : ₹983.50

कमर्शियल LPG सिलेंडर — 19 किलो

  • अहिल्यानगर : ₹2,790.00
  • अकोला : ₹2,830.00
  • अमरावती : ₹2,860.00
  • छत्रपती संभाजीनगर: ₹2,806.00
  • भंडारा : ₹2,936.50
  • बीड : ₹2,836.00
  • बुलढाणा : ₹2,809.00
  • चंद्रपूर : ₹2,912.00
  • धुळे : ₹2,816.50
  • गडचिरोली : ₹2,951.00
  • गोंदिया : ₹2,951.00
  • मुंबई : ₹2,701.00
  • हिंगोली : ₹2,832.00
  • जळगाव : ₹2,790.50
  • जालना : ₹2,812.50
  • कोल्हापूर : ₹2,724.50
  • लातूर : ₹2,827.00
  • नागपूर : ₹2,925.00
  • नांदेड : ₹2,832.00
  • नंदुरबार : ₹2,728.00
  • नाशिक : ₹2,777.00
  • धाराशिव : ₹2,833.00
  • पालघर : ₹2,730.00
  • परभणी : ₹2,837.50
  • पुणे : ₹2,761.00
  • रायगड : ₹2,727.00
  • रत्नागिरी : ₹2,783.50
  • सांगली : ₹2,724.50
  • सातारा : ₹2,768.00
  • सिंधुदुर्ग : ₹2,751.50
  • सोलापूर : ₹2,800.50
  • ठाणे : ₹2,702.50
  • वर्धा : ₹2,941.00
  • वाशिम : ₹2,822.50
  • यवतमाळ : ₹2,874.50

टीप: कमर्शियल सिलेंडरवर काही ठिकाणी मिळणारी अतिरिक्त सूट ही स्थानिक वितरकांच्या निर्णयावर आणि उपलब्ध स्टॉकवर अवलंबून असू शकते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला अधिकृत दरापेक्षा कमी किमतीत सिलेंडर मिळेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *