राज्यातील धरणं कोरडीच! गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात 11.65 टक्क्यांची घट, कोणत्या धरणात किती पाणी?

राज्याच्या काही भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबतही चिंता आहे. २१ सप्टेंबरच्या जलसाठा अहवालानुसार, राज्यातील ३ हजार ३२ धरणांमध्ये एकूण उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा ३१ हजार ८३.०१ दशलक्ष घनमीटर असून, तो एकूण उपयुक्त साठ्याच्या ७६.१६ टक्के आहे.

गतवर्षी याच दिवशी हा साठा ३८ हजार ८४५.३४ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ८७.८१ टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत ७ हजार ७६२.३३ दशलक्ष घनमीटर साठा कमी असून, टक्केवारीत तब्बल ११.६५ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील पाणीसाठ्याचे विभागनिहाय चित्र पाहता सर्वाधिक चिंता छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. या विभागातील धरणांमध्ये केवळ ४६.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ८१.२१ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात या विभागाच्या जलसाठ्यात मोठी घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *