मुंबईतून कोकणात पोहोचणे आता सोप्पे होणार; भाऊचा धक्का ते दिवेआगर थेट जलप्रवास, कसा असेल प्रकल्प?

मुंबई ते कोकण प्रवास दिवसेंदिवस खडतरच होत चालला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळं यंदाही गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. तसंच, रेल्वे मार्गे कोकणात जायचं म्हटलं तरी तिकीट मिळवण्यासाठी खूपच धडपड करावी लागते. कोकणात रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होतेय. पण आता या मागणीला यश येण्याची शक्यता आहे.

मुंबई ते दिवेआगर रो-रो सेवा सुरू होणार आहे. दिवेआगर येथील जेट्टीला मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळं या रो-रोमुळं भाऊचा धक्का ते दिवेआगर थेट जलप्रवास करता येणार आहे. तसंच, प्रवाशांना थेट वाहनंही नेता येणार आहेत.

कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मुंबईतून आता थेट आपल्या वाहनासह श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गाठण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. मुंबईच्या भाऊचा धक्का ते दिवेआगर अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यासाठी दिवेआगर येथील जेट्टीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *