सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. गावी गेलेले चाकरमनी पुन्हा एकदा मुंबईतच परतले आहेत. मुंबईतसुद्धा मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. मुंबईत गणेशोत्सवात लालबागच्या राजाला मोठा मान आहे. भक्तांची इच्छा, मनोकामना पुर्ण करणारा राजा म्हणून त्याची जगभरात ख्याती आहे. त्यामुळेच त्याचे दर्शन घ्यायला लांबून भाविक येतात. केवळ सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटी मंडळीही लालबागच्या राजाचे भक्त आहेत.
अलीकडेच अंबानी कुटुंबाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि रणवीर सिंग, जेनेलिया डिसूझा, रितेश देशमुख व जॅकी भगनानी यांसारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनीही तिथे जाऊन दर्शन घेतले. तर काल बॉलिवूड किंग शाहरुख खान आपली पत्नी गौरी, लेक सुहाना आणि मॅनेजर पूजा ददलानीसहसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेला.
